दर्जी फाऊंडेशनमध्ये विविध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गासाठी प्रवेश सुरू...
महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षांच्या निकालात अग्रेसर असलेल्या दर्जी फाऊंडेशनतर्फे आगामी येणार्या महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र शासनातर्फेे पोलीस दलाकरीता 23, 500 पदांची भरती होण्याची शक्यता आहे. यात पोलीस शिपाई, कारागृह रक्षक, चालक आणि बँड्समन यांची भरती होणार आहे. त्याचबरोबर 10 वी व 12 वी उत्तीर्ण उमेदवारांकरीता रेल्वे विभागामार्फतही मोठी भरती लवकरच केली जाणार आहे.
एम.पी.एस.सी.मार्फतही कम्बाईन परीक्षेच्या अंतर्गत पी.एस.आय., एस.टी.आय., ए.एस.ओ. व इतर पदांकरिता पूर्व परीक्षा जून महिन्यात घेतली जाणार आहे. दर्जी फाऊंडेशनतर्फे गट-ब व क च्या पदांकरिता स्वतंत्र इंटिग्रेटेड बॅचेसचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच नुकत्याच निघालेल्या एस.एस.सी., सी.जी.एल., बँक, रेल्वे या परीक्षांमध्ये खान्देशची टक्केवारी वाढावी यासाठी मार्गदर्शन वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. या सर्व मार्गदर्शन वर्गामध्ये बेसीक ते ऍडव्हॉन्स अभ्यासक्रम पूर्ण केला जाईल. स्टडी मटेरीअल, टेस्ट सिरीज, अभ्यासिका, कोर्स सोबत निःशुल्क दिल्या जातील. प्रा.गोपाल दर्जी सह तज्ञ शिक्षक वृंद यांच्याकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाईल. असे दर्जी फाऊंडेशनच्या संचालिका सौ.ज्योती दर्जी यांनी कळविले आहे. अधिक माहितीसाठी दर्जी फाऊंडेशन, दुसरा मजला ख्वॉजामिया दर्ग्यासमोर, गणेश कॉलनी रोड जळगांव येथे संपर्क साधावा.