Jalgaon
+919423186053
+919423186053

दर्जी फाऊंडेशनच्या विद्यार्थ्यांचे एमपीएससी परीक्ष...

दर्जी फाऊंडेशनच्या विद्यार्थ्यांचे एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश स्पर्धा परीक्षा क्षेत्रात महाराष्ट्रात अग्रेसर असलेल्या दर्जी फाऊंडेशनच्या विद्यार्थ्यांनी एमपीएससी राज्यसेवा आणि कम्बाईन परीक्षेच्या अंतिम निकालात घवघवीत यश संपादन केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीतर्फे राज्यसेवा आणि कम्बाईन परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला. यात दर्जी फाऊंडेशनच्या विद्यार्थ्यांनी यशस्वी बाजी मारली. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये मोनल भानुदास शेटे या विद्यार्थिनीची एआरटीओ पदावर निवड झाली आहे. तसेच किरण कापसे व नितीन गावित यांची मुख्याधिकारी, अनिकेत पवार - कक्षाधिकारी, प्रणिता होलसांबारे- उपअधीक्षक व अमोल नरुटे - औद्योगिक निरीक्षक पदावर निवड झाली आहे. . एमपीएससीच्या कम्बाईन परीक्षेत पीएसआय पदाच्या निकालातही दर्जी फाऊंडेशनच्या विद्यार्थ्यांनी यशस्वी बाजी मारली आहे यात अजिंक्य कदम, प्रवीण गव्हाणे, अमोलकुमार बोबडे, सुधीर घोलप, लक्ष्मण जाधव, पल्लवी कावडे आणि प्रशांत मरबाते यांची पीएसआय पदावर निवड झाली आहे. दर्जी फाऊंडेशनच्या गुणवत्तापूर्ण मार्गदर्शनामुळे नुकतेच यु.पी.एस.सी. च्या अंतिम निकालात 5 विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश हे खरोखरच उल्लेखनीय आहे. विद्यार्थ्यांनी 10 वी किंवा 12 वी पासूनच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू करावा असा आग्रह आम्ही करतो. यासाठी मिशन आय.ए.एस. सारख्या बॅचेसमधून विद्यार्थ्यांना यु.पी.एस.सी., एम.पी.एस.सी. परीक्षेचे परिपूर्ण मार्गदर्शन करण्यात येते. आजचा निकाल हे यासारख्या बॅचेसचे उत्तम उदाहरण आहे. म्हणून 10 वी, 12 वी ची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी पालकांसह दर्जी फाऊंडेशनला भेट द्यावी यामुळे भविष्यात ते देखील असे सर्वोत्कृष्ठ यश मिळवू शकतील असे मत प्रा.गोपाल दर्जी यांनी व्यक्त केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन प्रा.गोपाल दर्जी, सौ.ज्योती दर्जी व सर्व शिक्षकवृंद यांनी केले आहे.
 2025-05-09T11:37:50

Keywords