Jalgaon
+919423186053
+919423186053

दर्जी फाऊंडेशनतर्फे पोलीस व रेल्वे भरतीसाठी मार्गद...

दर्जी फाऊंडेशनतर्फे पोलीस व रेल्वे भरतीसाठी मार्गदर्शन वर्ग जळगाव । महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षांच्या निकालात अग्रेसर असलेल्या दर्जी फाऊंडेशनतर्फे महाराष्ट्र पोलीस व रेल्वे भरतीसाठी मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र शासनातर्फेे लवकरच पोलीस दलाकरीता 10, 000 पदांची भरती होण्याची शक्यता आहे. यात पोलीस शिपाई, कारागृह रक्षक, चालक आणि बँड्समन यांची भरती होणार आहे. त्याचबरोबर 10 वी व 12 वी उत्तीर्ण उमेदवारांकरीता रेल्वे विभागामार्फत गृप डी पदाकरीता 32438 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. खान्देशातील पात्र उमेदवारांची या दोन्ही परीक्षांची परिपूर्ण तयारी व्हावी याकरिता दर्जी फाऊंडेशनतर्फे मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. पोलीस भरतीच्या लेखी चाचणीसह, मैदानी चाचणीचेही यात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सदर मार्गदर्शन वर्ग दि. 10 मार्च पासून सुरू होणार आहेत. लेखी चाचणीत गणित, बुध्दिमत्ता चाचणीसह, सामान्य ज्ञान आणि चालूघडामोडी यांचे संपूर्ण मार्गदर्शन तज्ञ मार्गदर्शकांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. प्रा.गोपाल दर्जी हे देखील मार्गदर्शनासाठी उपस्थित राहणार आहेत. मैदानी चाचणीसाठी देखील स्वतंत्र प्रशिक्षक असून भरतीसाठी तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शन वर्गाचा लाभ घ्यावा असे आवाहन दर्जी फाऊंडेशनच्या संचालिका सौ.ज्योती दर्जी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी दर्जी फाऊंडेशन, दुसरा मजला ख्वॉजामिया दर्ग्यासमोर, गणेश कॉलनी रोड जळगांव येथे संपर्क साधावा.
 2025-03-07T11:06:33

Keywords