Jalgaon
+919423186053
+919423186053

एम.पी.एस.सी. परीक्षेत दर्जी फाउंडेशनचे घवघवित यश ...

एम.पी.एस.सी. परीक्षेत दर्जी फाउंडेशनचे घवघवित यश सर्वोत्तम यशासाठी राज्यसेवा व कम्बाईन परीक्षेसाठी मार्गदर्शन वर्ग एम.पी.एस.सी. तर्फे घेण्यात आलेल्या विविध परीक्षांमध्ये दर्जी फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांनी घवघवित यश संपादन केले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे मागील वर्षी घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षांचा निकाल जाहीर होत आहे या स्पर्धा परीक्षांचा अंतिम निकाल जाहीर होत आहे. यात इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण अधिकारी गट ब परीक्षेत दोन विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. यामध्ये रविकिरण मल्लिकार्जुन मलकुनाईक व लिंबाराज भिमराव वडावाले हे विद्यार्थी यशस्वी झाले आहेत तर टॅक्स असिस्टंट परीक्षेमध्ये कोमल दिलीप जैस्वाल, योगेश जयसिंग जोनवाल, निता किसन पवार आणि संतोष नागनाथ स्वामी या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. आगामी स्पर्धा परीक्षांमध्ये सर्वोत्तम यशासाठी दर्जी फाऊंडेशनतर्फे कम्बाईन आणि राज्यसेवा परीक्षेसाठी मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. एम.पी.एस.सी.मार्फत यावर्षी राज्यसेवा परीक्षेबरोबरच गट-ब आणि क वर्गाच्या पदांसाठी कम्बाईन परीक्षेतून पी.एस.आय., एस.टी.आय., ए.एस.ओ., लिपीक टंकलेखक व इतर पदांसाठी लवकरच जाहिरात येणार असून सर्वाधिक पदे भरली जाणार आहेत. यातील राज्यसेवा परीक्षा आणि कम्बाईन यांच्या पूर्व परीक्षेसह मुख्य परीक्षेचीही परिपूर्ण तयारी व्हावी म्हणून दर्जी फाऊंडेशन मार्फत स्वतंत्र मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आलेले आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये सर्वाधिक तरूणांना यशस्वी करणार्‍या दर्जी फाऊंडेशनकडून नविन राज्यसेवा परीक्षा आणि कम्बाईन परीक्षा यांसाठी स्वतंत्र बॅचेसचे आयोजन करण्यात आलेले आहे. नविन इंटिग्रेटेड बॅचेस दि. २० फेब्रुवारी पासून घेतल्या जाणार आहेत. पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या सर्व विषयांची परिपूर्ण तयारी व्हावी याकरिता या विषयांचे बेसिक ते ऍडव्हॉन्स् मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या परिक्षेचा सराव व्हावा म्हणून प्रत्येक शनिवारी सराव पेपर घेतले जाणार असून शेवटी टेस्ट सिरीजही घेतली जाईल. या बॅचेसमध्ये प्रवेश घेतलेल्या उमेदवारांना नोट्स देखील पुरविल्या जाणार असून अभ्यासिका सुध्दा उपलब्ध राहणार आहे. संस्थेचे अध्यक्ष प्रा.गोपाल दर्जी हे स्वतः देखील मार्गदर्शन करणार असून खान्देशातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शन वर्गाचा लाभ घ्यावा असे आवाहन संचालिका सौ.ज्योती दर्जी यांनी केले आहे. अधिकमाहितीसाठी दर्जी फाऊंडेशन, दुसरा मजला, ख्वॉजामिया दर्ग्यासमोर, गणेश कॉलनी रोड, जळगांव येथे संपर्क साधावा.
 2025-02-18T02:54:15

Keywords