दर्जी फाऊंडेशनमध्ये क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले जयंती साजरी
जळगांव येथील स्पर्धा परीक्षा क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या दर्जी फाऊंडेशनमध्ये सावित्रीबाई फुले ज्यंती निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात आपले विचार मांडतांना प्रा.गोपाल दर्जी म्हणाले की, सावित्रीबाई जोतीराव फुले ह्या भारतीय शिक्षिका, कवयित्री व समाजसुधारक होत्या. त्यांनी आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतीराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली. आपल्या नायगाव या गावावर त्यांनी एक प्रसिद्ध कविता लिहिली आहे. त्यांनी स्त्री व शूद्रांमधे शिक्षणाचा प्रसार केला असून त्या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका होत्या.
अंगावर शेण फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. पण अनेक संघर्ष करत हा सावित्रीबाईंचा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच ठेवला. त्यासाठी त्यांना घर सोडावे लागले. सगुणाऊ सोडून गेली. अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत, त्याचाच परिणाम आज आमच्या भगिनी असंख्य संख्येने शिक्षण घेतांना दिसतात असे आपल्या मनोगतात प्रा.गोपाल दर्जीनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दर्जी फाऊंडेशनचे संचालिका सौ. ज्योती दर्जी, व दर्जी फाऊंडेशनच्या शिक्षकवृदांनी सहकार्य केले.