एम.पी.एस.सी. परीक्षेत दर्जी फाऊंडेशनच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
एम.पी.एस.सी.च्या विक्रीकर निरीक्षक म्हणजेच एस.टी.आय. गट-ब पदी दर्जी फाऊंडेशनच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलेले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फेे एस.टी.आय. पदासाठी घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेचा सुधारित निकाल नुकताच जाहिर झाला असून या अंतीम निकालात दर्जी फाऊंडेशनच्या चार विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये पुजा शिवाजीराव शिंदे, साक्षी मधुकर देसाई, रोहन डिगंबर बलगुडे, पियुष दत्तात्रय सुपेकर यांनी अंतीम यादीतून यश संपादन केलेले आहे. दर्जी फाऊंडेशनच्या गुणवत्तापूर्ण मार्गदर्शनामुळे प्रत्येक स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थी यशस्वी होत आहेत. नुकत्याच जाहिर झालेल्या यु.पी.एस.सी.च्या निकालात देखील दहा विद्यार्थी यशस्वी झालेले असून एम.पी.एस.सी. राज्यसेवा परीक्षेतून बावीस विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. या निकालातूनच दर्जी फाऊंडेशनची गुणवत्ता सिध्द होते. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रा.गोपाल दर्जी व सौ.ज्योती दर्जी यांनी अभिनंदन केले.
10 वी, 12 वी ची परीक्षा दिलेल्या किंवा उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी दर्जी फाऊंडेशनतर्फे मिशन आय.ए.एस. बॅचेसमधून यु.पी.एस.सी. व एम.पी.एस.सी. या परीक्षांसह इतरही स्पर्धा परीक्षांची तयारी केली जाते. या बॅचेसमधून मार्गदर्शन घेतल्यास हमखास यश मिळू शकते. म्हणून एम.पी.एस.सी., यु.पी.एस.सी.सह पोलीस भरतीच्या नवीन बॅचेस 1 एप्रिल 2026 पासून सुरू होणार असून या बॅचेसचा लाभ घ्यावा यासाठी अधिक माहितीसाठी दर्जी फाऊंडेशन दुसरा मजला, ख्वॉजामिया दर्ग्यासमोर, गणेश कॉलनी रोड येथे संपर्क साधावा असे आवाहन सौ.ज्योती दर्जी यांनी केले आहे.