Jalgaon
+919423186053
+919423186053

स्टाफ सिलेक्शन परीक्षेत दर्जी फाऊंडेशनच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश सर्वोत्तम यशासाठी नवीन बॅचेस कर...

स्टाफ सिलेक्शन परीक्षेत दर्जी फाऊंडेशनच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश सर्वोत्तम यशासाठी नवीन बॅचेस करीता प्रवेश सुरू... स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे घेण्यात आलेल्या विविध परीक्षांमध्ये दर्जी फाऊंडेशनच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. केंद्रीय पोलीस सेवेतील जनरल ड्युटीसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत जी.डी. पदाकरीता लेखी परीक्षा व मैदानी चाचणी घेण्यात आलेली होती. या परीक्षांचा अंतीम निकाल नुकताच जाहीर झालेला असून दर्जी फाऊंडेशनच्या तीन विद्यार्थ्यांनी यात यश संपादन केलेले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये सुनिल नंदलाल पावरा या विद्यार्थ्याची सी.आय.एस.एफ मध्ये निवड झालेली असून राहुल डिगंबर सोनवणे हा एस.एस.बी. पदावर यशस्वी झालेला आहे. अश्‍विनी दिलीप जाधव या विद्यार्थीनीची सी.आर.पी.एफ. मध्ये निवड झालेली आहे. दर्जी फाऊंडेशनचे लेखी व मैदानी चाचणीच्या सर्वोेत्तम मार्गदर्शनामुळे महाराष्ट्र पोलीस, केंद्रीय पोलीस, रेल्वे भरती व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये सर्वाधिक विद्यार्थी यशस्वी होत आहेत. सध्या सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेतही दर्जी फाऊंडेशनचे जास्तीत जास्त विद्यार्थी यशस्वी व्हावेत या दृष्टीने मार्गदर्शन सुरू आहे. यशस्वी विद्यार्थ्यांची प्रा.गोपाल दर्जी व सौ.ज्योती दर्जी यांनी अभिनंदन केले. सध्या महाराष्ट्र पोलीस दलात 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी 15631 पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया सुरू आहे. त्याचबरोबर स्टाफ सिलेक्शन जी.डी. पदासाठी देखील फॉर्म भरणे सुरू आहे. या भरतीकरिता लेखी व मैदानी चाचणीचे परिपूर्ण तयारी व्हावी म्हणून नवीन बॅचेस 27 जानेवारी 2026 पासून सुरू होणार आहेत. दर्जी फाऊंडेशनतर्फे घेण्यात येणार असून यासाठी प्रवेश सुरू आहेत. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी निवास व भोजनाची सोय उपलब्ध आहे. म्हणून अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या बॅचेसचा लाभ घ्यावा असे आवाहन सौ.ज्योती दर्जी यांनी केले आहे.
 2026-01-19T11:24:54

Keywords