एम.पी.एस.सी.परीक्षेत दर्जी फाऊंडेशनच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
सर्वोत्तम यशासाठी नवीन बॅचेस करीता प्रवेश सुरू...
महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एम.पी.एस.सी. तर्फे घेण्यात आलेल्या विविध परीक्षांमध्ये दर्जी फाऊंडेशनच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. एम.पी.एस.सी.तर्फे पशुधन विकास अधिकारी गट-अ पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा अंतीम निकाल जाहीर झालेला असून यात दर्जी फाऊंडेशनचे तीन विद्यार्थी यशस्वी झालेले आहे. यात बालाजी संजयराव डोंगरे, आशिष बाबुराव भोयर, गोपाल श्रीराम गव्हाड या विद्यार्थ्यांची पशुधन विकास अधिकारी गट-अ पदावर निवड झालेली आहे. यात बालाजी डोंगरे हा ई.डब्ल्यू.एस. संवर्गातून महाराष्ट्रात दुसर्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेला आहे. एम.पी.एस.सी.च्या असिस्टंट इंजिनिअर (सिव्हील) गट-ब पदासाठी मयुरी हेमराज बडगुजर हिची निवड झालेली आहे. एम.पी.एस.सी.च्या कम्बाईन परीक्षेच्या अंतीम निकालातही दर्जी फाऊंडेशनच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविलेले आहे. यात प्रज्ञा लिंगप्पा चौधरी व इरफान पठाण यांची एस.टी.आय. व ए.एस.ओ. या दोन्ही पदांवर निवड झालेली आहे. तर साक्षी मधुकर देसाई हिची एस.टी.आय. पदी निवड झालेली आहे. यातील इरफान पठाण हा एस.टी.आय. परीक्षेत ई.डब्ल्यू.एस. संवर्गात महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांची प्रा.गोपाल दर्जी व सौ.ज्योती दर्जी यांनी अभिनंदन केले.
एम.पी.एस.सी.राज्यसेवा सह कम्बाईन व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये दर्जी फाऊंडेशनचे विद्यार्थी सातत्याने यशस्वी होत आहेत. आगामी काळात लवकरच पोलीस दलात 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी 15631 पदांसाठी मोठी भरती होणार आहे. या भरतीकरिता लेखी व मैदानी चाचणीचे परिपूर्ण तयारी व्हावी म्हणून नवीन बॅचेस 22 सप्टेंबर पासून सुरू होणार आहेत. शिक्षक पदासाठी लागू असलेल्या टीईटी परीक्षेकरिताही नवीन बॅचेस दर्जी फाऊंडेशनतर्फे घेण्यात येणार असून यासाठी प्रवेश सुरू आहेत. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी निवास व भोजनाची सोय उपलब्ध आहे. म्हणून अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या बॅचेसचा लाभ घ्यावा असे आवाहन सौ.ज्योती दर्जी यांनी केले आहे