Jalgaon
+919423186053
+919423186053

दर्जी फाऊंडेशनतर्फे एम.पी.एस.सी. व पोलीस भरती परीक्षेसाठी मार्गदर्शन वर्ग महाराष्ट्रात स्पर्धा परीक्...

दर्जी फाऊंडेशनतर्फे एम.पी.एस.सी. व पोलीस भरती परीक्षेसाठी मार्गदर्शन वर्ग महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षांच्या निकालात अग्रेसर असलेल्या दर्जी फाऊंडेशनतर्फे आगामी येणार्‍या सर्व सरळसेवा परीक्षा 2025 पासून एम.पी.एस.सी. अंतर्गत घेतल्या जातील. म्हणून विद्यार्थ्यांनी एम.पी.एस.सी. परीक्षेचे सखोल ज्ञान घेणे गरजेचे आहे. एम.पी.एस.सी. अंतर्गत होणार्‍या राज्यसेवा 2025 सुधारित अभ्यासक्रमानुसार वैकल्पिक विषयासह तसेच पूर्व, मुख्य व मुलाखतीसह संपूर्ण विषयाचे मार्गदर्शन नाशिक विभागात फक्त दर्जी फाऊंडेशन जळगांव येथे मिळते. तसेच कम्बाईनची तयारी अर्थात गट-ब व क परीक्षेंची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी दर्जी फाऊंडेशनमध्ये कम्बाईन व सरळसेवा परीक्षांच्या दृष्टीकोनातून बॅचेसचे आयोजन योजिले आहे. नवीन बॅचेससाठी प्रवेश सुरू केलेले आहेत. विद्यार्थ्यांना काही संभ्रम असल्यास प्रा.गोपाल दर्जी पाटील यांच्याकडून करिअर कौन्सिलींग व परीक्षेचे नियोजन करून घ्यावे असे दर्जी फाऊंडेशनच्या संचालिका सौ.ज्योती दर्जी पाटील यांनी कळविले आहे. आगामी होणार्‍या पोलीस व सैन्य भरती यांचा विचार करून ग्रामीण भागातील युवकांना कमी वयात सरकारी रोजगार मिळावा यासाठी दर्जी फाऊंडेशन जळगांव येथे भरतीपूर्व प्रशिक्षण उत्तम मैदानी मार्गदर्शन उत्तम मैदानी मार्गदर्शक व लेखी मार्गदर्शक यांच्याद्वारे दिवसाला दररोज अभ्यासिकेसह 10 तासाचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मिळणार आहे. ज्यांना पोलीस व सैन्य भरती करायची आहे. त्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणासाठी संपर्क दर्जी फाऊंडेशन, दुसरा मजला ख्वॉजामिया दर्ग्यासमोर, गणेश कॉलनी रोड जळगांव येथे संपर्क साधावा. प्रा.गोपाल दर्जी पाटील यांनी एम.पी.एस.सी.परीक्षेत 64 विद्यार्थी पास झाले. ही 1998 पासूनची यशाची पावती आहे. असे उद्गार काढले. आजवर बँक परीक्षा, स्टाफ सिलेक्शन, सरळसेवा, एम.पी.एस.सी., यु.पी.एस.सी. यांचा निकाल 10 वी व 12 वी विद्यार्थ्यांच्या शिक्षणापासून पदवी शिक्षण घेईपर्यंत येत असतो. त्याचा मनस्वी आनंद आहे.
 2025-07-14T11:54:33

Keywords