Jalgaon
+919423186053
+919423186053

दर्जी फाऊंडेशनच्या 6 विद्यार्थ्यांची एस.टी.आय. व स...

दर्जी फाऊंडेशनच्या 6 विद्यार्थ्यांची एस.टी.आय. व सबरजिस्टार पदी निवड स्पर्धा परीक्षांच्या निकालात महाराष्ट्रात अव्वल असलेल्या दर्जी फाऊंडेशनच्या 6 विद्यार्थ्यांची एस.टी.आय. व सबरजिस्टार पदी यशस्वी निवड झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विक्रीकर निरीक्षक म्हणजे एस.टी.आय. व उपनिबंधक म्हणजेच सबरजिस्टार श्रेणी-1 परीक्षेचा अंतीम निकाल नुकताच जाहिर झाला. या अंतिम निकालात दर्जी फाऊंडेशनच्या 6 विद्यार्थ्यांनी यश मिळविलेले आहे. सबरजिस्टारपदी निवड झालेल्या विद्यार्थ्यांमधील अमोल नाना डोंगरे हे अंतीम निकालात खुल्या संवर्गात महाराष्ट्रातून 10 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. तर पवन बाबुराव मोरे यांनी निवड यादीत महाराष्ट्रात 16 व्या क्रमांकाने यश मिळविलेले आहे. विक्रीकर निरीक्षक पदासाठी निवड झालेल्या प्रियंका विजय पाटील यांनी ओबीसी महिला संवर्गात महाराष्ट्रात दुसर्‍या क्रमांक पटकावला आहे. तर शुभम शिवाजीराव खरात याने खुल्या संवर्गात महाराष्ट्रातून 12 व्या क्रमांकाने यश मिळविलेले आहे. अमोल डोंगरे व पवन मोरे यांची एस.टी.आय.पदी देखील निवड झालेली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रा.गोपाल दर्जी यांच्यासह सौ.ज्योती दर्जी यांनी अभिनंदन केले. 1998 पासून एम.पी.एस.सी.सह इतर सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये दर्जी फाऊंडेशनचे विद्यार्थी यशस्वी होत आहे. यातून फाऊंडेशनचे गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन व यशाची परंपरा प्रखरतेने दिसून येते. 10 वी, 12 वी नंतर पदवी शिक्षणासह स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केल्यास स्पर्धा परीक्षांमधील यश लवकर प्राप्त होते. म्हणून यशाच्या चळवळीत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे. प्रा.गोपाल दर्जी
 2023-12-27T12:30:56

Keywords