Jalgaon
+919423186053
+919423186053

दर्जी फाऊंडेशनच्या 27 विद्यार्थ्यांचे एम.पी.एस.सी....

दर्जी फाऊंडेशनच्या 27 विद्यार्थ्यांचे एम.पी.एस.सी. राज्यसेवा परीक्षेत घवघवीत यश जळगांवचा प्रसाद चौधरी राज्यात ओबीसी संवर्गातून दुसरा महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षेत अगे्रसर असलेले दर्जी फाऊंडेशनच्या 27 विद्यार्थ्यांनी एम.पी.एस.सी. राज्यसेवा परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा 2021 परीक्षेचा अंतीम निकाल आज जाहीर झालेला असून यात दर्जी फाऊंडेशनच्या विद्यार्थ्यानी विशेष यशासह उल्लेखनीय बाजी मारलेली आहे. विशेष म्हणजे यात 14 विद्यार्थ्यांची गट-अ पदी निवड झालेली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये संतोष खाडे यांची डी.वाय.एस.पी. पदी निवड झालेली असून ते खुल्या प्रवर्गातून महाराष्ट्रातून तिसरे आलेले आहेत. तसेच पुजा पवार यांची डी.वाय.एस.पी पदी ओबीसी महिला संवर्गातून महाराष्ट्रात पहिली आलेली आहे. सहाय्यक विक्रीकर राज्य आयुक्त पदी दर्जी फाऊंडेशनचे 6 विद्यार्थ्यांची निवड त्यात जळगावचे प्रसाद चौधरी, अजित लोखंडे, प्रविण मोरे, आनंद जाधव, निकीता गर्दे व विक्रांत जाधव होत. गटविकास अधिकारी गट-अ पदी योगेश गडे खुल्या प्रवर्गातून चौथा आलेला आहे. सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा गट -अ पदी दोन विद्यार्थ्यांची निवड झाली त्यात सोमनाथ कराड व जयेश देवरे हे होत. वैभव पडवाल याची डेप्युटी रजिस्टार गट-अ तसेच नागनाथ व दत्ता मोहिते यांची सहाय्यक कामगार आयुक्त गट-अ पदी निवड झालेली आहे गट-ब पदी निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये यमाजी धुमाळ, सुप्रिया चव्हाण, रश्मिता साहू आणि सोनल काळे यांची मुख्याधिकारी पदी निवड झालेली असून रोहित काळे सहाय्यक गटविकास अधिकारी, गणेश सहाणे, शितल एैवाळे व निलेश शिवरकर यांची सहाय्यक कामगार अधिकारी, प्रदीप गोराड व भुप्रेद्र येवले यांची कौशल्य विकास अधिकारी, प्रणिता काळे व अंजली बर्गे यांची उपशिक्षणाधिकारी तसेच पुजा सांगळे हिची असिस्टंट रजिस्टर पदी निवड झालेली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांमधील प्रसाद चौधरी हा जळगांव शहरातील द्वारकानगरमधील रहिवाशी असून त्याचे वडिल पोलीस दलात सहाय्यक फौजदार असून दक्षता पेट्रोल पंपावर व्यवस्थापक पदी कार्यरत आहेत. दर्जी फाऊंडेशनचे संचालक प्रा.गोपाल दर्जी यांच्याकडून त्यांचा सत्कार करण्यात आलेला असून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे देखील अभिनंदन सौ.ज्योती दर्जी व शिक्षकवृंद यांनी केले आहे. त्यावेळेला प्रा.गोपाल दर्जी म्हणाले की, 10 वी व 12 वी पासून विद्यार्थ्यांनी यु.पी.एस.सी. व एम.पी.एस.सी. परीक्षांची तयारी केल्यास पहिल्या प्रयत्नामध्ये आपला यशस्वी निकाल योग्य मार्गदर्शनाने सहज लागू शकतो. हेच आजच्या निकालावरून दिसून येते.
 2023-05-24T17:25:12

Keywords