राष्ट्रीय मतदार दिन महत्व आणि कर्तव्य (25 जानेवारी)
भारतीय निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस २५ जानेवारी आहे. म्हणून २०११ पासून आपल्या देशात दरवर्षी २५ जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो. देशातील मतदार प्रत्येक निवडणुकीतून आपल्या मतांनी देशाचे आणि राज्याचे सरकार निवडून देत असल्याने हा एक प्रकारे सण मनला जातो . मतदार दिन साजरा करण्याचा उद्देश म्हणजे भारतातील नागरिकांना मतदार म्हणून त्यांचे हक्क आणि जबाबदाऱ्यांबद्दल जागरुक करणे हा आहे. 25 जानेवारीला हा सण साजरा करण्यामागे एक खास कारणही आहे. खरे तर 25 जानेवारी 1950 रोजी देशात निवडणूक आयोगाची स्थापना झाली. या दिवसाच्या स्मरणार्थ आणि निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस साजरा करण्यासाठी राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला.
भारतीय संविधानाची ६१वी घटनादुरुस्ती, ज्याला अधिकृतपणे संविधान (६१वी दुरुस्ती) कायदा, १९८८ या नावाने ओळखला जाते, या दुरुस्तीने लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांचे मतदान वय २१ वर्षांवरून १८ वर्षांपर्यंत कमी केले. लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुकांशी संबंधित असलेल्या भारतीय घटनेच्या कलम ३२६ मध्ये सुधारणा करून हे केले गेले.
25 जानेवारी रोजी निवडणूक आयोग आणि इतर सामाजिक संस्था लोकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करतात. तसेच निवडणूक आयोग दरवर्षी 18 वर्षांच्या तरुण नवमतदारांना ओळखपत्रे देऊन या मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येते.राष्ट्रीय मतदार दिनाचे उद्घाटन 25 जानेवारी 2011 रोजी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते झाले.
भारताच्या विकासासाठी प्रत्येकाने मतदान करणे गरजेचे ..
या वर्षी लोकसभेसह विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. देशाच्या विकासात प्रत्येक भारतीय नागरिकाची भूमिका महत्वाची असते म्हणून अशा मतदानावेळी प्रत्येक मतदाराने मतदान करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण प्रत्येक नागरिकाचे मत नवा भारत घडवते. भारताची प्रगती आणि विकास हे मतदारांच्या मताने ठरवले जाते. राष्ट्रीय मतदार दिनाचे स्वतःचे खास कारण आहे. देशाचा जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने मतदान केले पाहिजे.
भारतीय लोकशाहीत नागरिकांची भूमिका महत्त्वाची आहे. सरकार निवडून नागरिक देशाची दिशा ठरवतात. म्हणून राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने प्रत्येकाने सजग राहून मतदान करावे आणि इतरांनाही मतदान करण्यासाठी प्रेरित करावे.
प्रा. गोपाल दर्जी
संचालक दर्जी फाउंडेशन जळगाव
9423186053