दर्जी फाउंडेशनतर्फे 10 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी मिशन आयएएस बॅचेस
स्पर्धा परीक्षा क्षेत्रात महाराष्ट्रात अग्रगण्य असलेल्या दर्जी फाउंडेशनतर्फे 10 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांना शासकीय नोकरीकडे योग्य वाटचाल करता यावी यासाठी मिशन आयएएस बॅचेसचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससी आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी यांच्यामार्फत दरवर्षी विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन करण्यात येते. यात गट अ, गट ब किंवा गट क यासारख्या पदांची निवड करण्यात येते. त्याचबरोबर स्टाफ सिलेक्शन कमिशन, रेल्वे विभाग, बँक परीक्षा, सरळसेवा परीक्षा, तलाठी भरती, पोलीस व सैन्य भरती यासारख्या अनेक परीक्षा होत असतात. म्हणून शासकीय नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही मोठी संधी असते. पदवी पूर्ण होण्याची वाट न पाहता 10 वी, 12 वी पासूनच स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला सुरुवात केल्यास आणि गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन घेतल्यास हमखास यश मिळू शकते. म्हणूनच यूपीएससी आणि एमपीएससी किंवा इतर स्पर्धा परीक्षांमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे यशाचे प्रमाण वाढावे यासाठी दर्जी फाउंडेशनतर्फे मिशन आयएएस बॅचेस घेण्यात येणार आहेत.
10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी 5 वर्षे आणि 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी 3 वर्षे यूपीएससी आणि एमपीएससी किंवा इतर स्पर्धा परीक्षांचे नियमित मार्गदर्शन केले जाईल. सदर नवीन बॅचेस दि. 15 जुलै पासून सुरुवात होणार असून यात प्रा. गोपाल दर्जी यांच्यासह तज्ञ मार्गदर्शकांकडून पूर्व व मुख्य परीक्षांचे बेसिकपासून ऍडव्हान्स पर्यंत सखोल मार्गदर्शन करण्यात येईल. साप्ताहिक सराव पेपर, अद्यावत नोट्स आणि अभ्यासिका यातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीवर भर दिला जाईल. त्याचबरोबर कुटुंब संस्कार, नेतृत्व गुण, संकटांना सामोरे कसे जावे याबाबतही माहिती दिली जाईल. सुखकर आयुष्य आणि उज्ज्वल भविष्यासाठी शासकीय नोकरी हा सर्वोत्तम पर्याय असून यासाठी दर्जी फाउंडेशनच्या मिशन आयएएस बॅचेसचा लाभ घेतल्यास किमान एक तरी शासकीय नोकरी मिळू शकते. म्हणून या बॅचेसविषयी अधिक माहितीसाठी विद्यार्थी आणि पालकांनी दर्जी फाउंडेशन दुसरा मजला ख्वाजामिया दर्ग्यासमोर गणेश कॉलनी रोड जळगाव येथे प्रत्यक्ष संपर्क साधून आपले भविष्य सुखकर करावे असे आवाहन सौ. ज्योती दर्जी यांनी केले आहे.