Jalgaon
+919423186053
+919423186053

दर्जी फाऊंडेशनमध्ये 10 वी व 12 वी विद्यार्थ्यांसाठ...

दर्जी फाऊंडेशनमध्ये 10 वी व 12 वी विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीसाठी मार्गदर्शन वर्गाचे आयोजन जळगांव येथील स्पर्धा परीक्षा क्षेत्रात तसेच उत्तर महाराष्ट्रात अग्रेसर असलेली व महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षांच्या निकालात सर्वोच्च असणार्‍या दर्जी फाऊंडेशन येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आलेले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी नुकतीच 10 वी व 12 वी ची परीक्षा दिलेली आहे किंवा पास आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी कर्मचारी ते अधिकारी अशा विविध पदांसाठी होणार्‍या व सर्वांना अपेक्षित असलेल्या सरकारी नोकरीसाठी धडपडणार्‍या विद्यार्थ्यांसाठी अशा स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन दि.10 एप्रिल पासून दर्जी फाऊंडेशन दुसरा मजला, ख्वॉजामिया दर्ग्यासमोर, गणेश कॉलनी रोड, जळगांव येथे विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या मार्गदर्शनात अधिकारी होण्यासाठी अर्थात यु.पी.एस.सी., एम.पी.एस.सी., बँक, स्टाफ सिलेक्शन, अशा परीक्षांसाठी फाऊंडेशन बॅचेस जिला आय.सी.डी.सी. बॅच नावाने ओळखले जाते. या बॅचेसमध्ये पदवी शिक्षणासोबत 10 वी नंतर 5 वर्ष, 12 वी 3 वर्ष मराठी व इंग्रजी माध्यमात मार्गदर्शन मिळणार आहे. आगामी काळात महाराष्ट्र शासनातर्फे सरळसेवा परीक्षाअंतर्गत 75000 पदांसाठी सर्वात मोठी भरती होणार आहे. किमान 10 वी पास ते उच्चशिक्षित विद्यार्थ्यांसाठी यात विविध पदे भरली जाणार आहेत. तसेच नुकतेच 10 वी पास विद्यार्थ्यांसाठी सी.आर.पी.एफ. मध्ये 9212 पदांसाठी जाहिरात आलेली असून ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू आहे. केंद्रशासनामार्फत 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सी.आर.पी.एफ. अंतर्गत जनरल ड्युटी साठी 129929 पदांना नुकतीच मान्यता दिलेली आहे. लवकरच यासाठी आजपर्यंतची सर्वात मोठी भरती घोषित होणार आहे. या परीक्षांसाठी असलेल्या मैदानी व लेखी परीक्षांचे मार्गदर्शन दर्जी फाऊंडेशन मध्ये मिळणार आहे. अशी माहिती प्रा.गोपाल दर्जी यांनी कळविली आहे. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी निवास व भोजन व्यवस्था देखील उपलब्ध करण्यात आलेली आहे. तरी सर्वांनी या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन दर्जी फाऊंडेशनच्या संचालिका सौ.ज्योती दर्जी यांनी केले आहे
 2023-04-07T12:20:19

Keywords