Currently it only shows your basic business info. Start adding relevant business details such as description, images and products or services to gain your customers attention by using Boost 360 android app / iOS App / web portal.
दर्जीतर्फे संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी
दर्जीतर्फेे कम्बाईन परीक्षा व अभियोग्यता चाचणीसाठी मार्गदर्शन वर्ग जळगांव येथील स्पर्धा परीक्षा क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या दर्जी फाऊंडेशनतर्फे एम.पी.एस.सी. कम्बाईन परीक्षा आणि शिक्षक भरतीसाठी आवश्यक असलेले शिक्षक अभियोग्यता चाचणी अर्थात टेट परीक्षेसाठी मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मार्गदर्शन वर्ग दि.5 फेबु्रवारी पासून सुरू होणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे गट-ब व गट क पदासाठीच्या 8169 जागांची जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. यात पी.एस.आय.,एस.टी.आय.,ए.एस.ओ.,करसहाय्यक, लिपीक टंकलेखक व इतर पदे भरली जाणार आहेत. यासाठी दि.30 एप्रिल रोजी पूर्व परीक्षा होणार असून प्राथमिक व माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक पदाकरिता शासनाने लागू केलेली शिक्षक अभियोग्यता चाचणी ही परीक्षा दि.22 फेबु्रवारी ते 3 मार्च या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने घेतली जाणार आहे. खान्देशातील किमान पदवीधारक विद्यार्थ्यांसाठी कम्बाईन परीक्षा मोठी संधी असून डी.एड. व बी.एड. उत्तीर्ण उमेदवारांकरीता चार वर्षानंतर अभियोग्यता चाचणी होत आहे. या परीक्षांची योग्य पध्दतीने तयारी व्हावी म्हणून दर्जी फाऊंडेशनतर्फे मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आलेले आहे. आयोगाने लागू केलेल्या अंकगणित, बुध्दिमत्ता चाचणी, सामान्य ज्ञान, चालुघडामोडी यांचे विस्तृत मार्गदर्शन यात केले जाणार असून साप्ताहिक सराव पेपर, टेस्ट सिरीज, अद्ययावत अशा विस्तृत नोट्स देखील फाऊंडेशन मार्फत पुरविल्या जाणार आहेत. प्रा.गोपाल दर्जी हे स्वतः मार्गदर्शनासाठी उपस्थित राहणार आहेत. संस्थेचे इतर तज्ञ मार्गदर्शक विषयनिहाय मार्गदर्शन करणार असून विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका देखील उपलब्ध असेल हे मार्गदर्शन वर्ग विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वपूर्ण असून खान्देशातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सौ.ज्योती दर्जी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी दर्जी फाऊंडेशन दुसरा मजला, ख्वॉजामिया दर्ग्यासमोर, गणेश कॉलनी रोड, जळगांव येथे संपर्क साधावा.
MPSC (Combine) Exam Notification 2023